संसाराची लग्नगाठ बांधून आठ महिनेच झाले...आणि आक्रित घडले! नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल!!

 



Pandharpur Live Online: संसाराची लग्नगाठ बांधून आठच महिने झाले होते पण आठ महिन्यानंतर आक्रित घडलं. नवविवाहितेने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले.

 वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा येथील नवविवाहितेने राहत्या घरी गुरुवार (दि.२६) आत्महत्या केली. सई प्रसन्न भंडारी (वय २१) असे तिचे नाव आहे.

सई हिला उपचारासाठी कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. 

आठ महिन्यांपूर्वीच तिचे वाडी रत्नागिरी येथील प्रसन्न भंडारी यांच्याबरोबर विवाह झाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेन करण्यात आले. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली असून, तपास कोडोली पोलीस करीत आहेत.

..............................

Post a Comment

0 Comments