मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थाना जवळच महिला कॉन्स्टेबलवर लोखंडी रॉडनं हल्ला!


 
Pandharpur Live Online: महिला पोलीस कर्मचाऱ्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तरुणानं कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. आरोपीनं पोलीस कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यामुळे कर्मचाऱ्याचं डोकं फुटलं. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून १० मिनिटांच्या अंतरावर महिला कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आली. सदर कॉन्स्टेबल अलीगंज पोलिसस्टेशनमध्ये कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर आरोपी तरुण प्रभात सिंहनं आक्षेपार्ह टिप्पणी केली. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं विरोध करून स्कूटी थांबवून याबद्दल तरुणाला जाब विचारला. त्यानंतर आरोपीनं महिला कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यामुळे महिला स्कूटीवरून खाली पडली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तरुणाला अटक केली आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. महिलेवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

महिला पोलिसावर आक्षेपार्ह टिप्पणी, सरकारी कामात अडथळा याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३३३, ३५३ आणि ३५४ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Pandharpur Live Contact information
Mobiles : 7972287368, 8308838111
Mail: livepandharpur@gmail.com


Post a Comment

0 Comments