सिंहगड इन्स्टिट्युट मधील २ विद्यार्थ्यांची "एलियन ब्रेनस्" कंपनीत निवड

 


पंढरपूर: प्रतिनिधी

सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन मुलाखत घेण्यात आली. या ऑनलाईन मुलाखतीतून सिंहगड इन्स्टिट्युट मधील तनया सिंग व किर्तना मुदलियार या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे यांनी दिली.

     अल्पावधीतच सिंहगड इन्स्टिट्युटने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात नावलौकिक संपादित करून शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्ह मधुन सिंहगड इन्स्टिट्युट मधील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असुन "एलियन ब्रेनस्" या कंपनीकडून वार्षिक ३ लाख रूपये इतका पगार मिळणार आहे. हि कंपनी उत्पादन आणि सेवा आधारित कंपनी आहे.

 सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्लेसमेंट विभाग कार्यरत असुन जगातील नामांकित व बहुराष्ट्रीय कंपनीत तसेच शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असलेले गुण, कौशल्य विद्यार्थ्यांना दिले जाते.

   सिंहगड इन्स्टिट्युटचा शैक्षणिक क्षेत्रातील आलेख हा प्रत्येक वर्षी उंचावत आहे. सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये विद्यार्थ्यांचे मानवी अधिकार, मुलभुत अधिकार अबाधित राखून पालकांच्या विश्वास पाञ ठरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण, गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारे सिंहगड इन्स्टिट्युट म्हणून सिंहगड इन्स्टिट्युट चा वेगळा नावलौकिक संपूर्ण जगात आहे. अशा या नामांकित सिंहगड इन्स्टिट्युट मधील तनया सिंग व किर्तना मुदलियार दोन विद्यार्थ्यांची "एलियन ब्रेनस्" या कंपनीत निवड झाल्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्युट   मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Pandharpur Live Contact information
Mobiles : 7972287368, 8308838111
Mail: livepandharpur@gmail.com


Post a Comment

0 Comments