Pandharpur Live Video News Updates
Pandharpur Live Online: शेकापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांची तब्बल 234 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक अन्य ठिकाणच्या भूखंडांचा समावेश आहे.
.............
...................
.........................
रिझर्व्ह बँकेला कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारात अनियमितपणा निदर्शनास आल्याने त्यांनी सहकार आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तातडीने रायगड जिल्हा विशेष लेखा परीक्षक यू. जी. तुपे यांची नियुक्ती करून पुनर्तपासणी केल्यानंतर 63 कर्ज खात्यांद्वारे 512 कोटींचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर चौकशीत तो आकडा 529 कोटीवर गेला आहे.
दीड वर्षापूर्वी ठेवी स्वीकारण्याला व कर्ज वितरणावर निर्बंध आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रद्दबातल केला. पुरेशा भांडवलाचा अभाव आणि ठेवीदारांचा पैसा पूर्णपणे परत करता येईल इतकीही बँकेची आर्थिक स्थिती नाही, असे त्यासाठी कारण देण्यात आले आहे.
0 Comments