बोंबला ! बर्गर खायची लहर आली! अन लग्नमंडप सोडून नवरी थेट बर्गर किंगमध्ये पळाली !!



Pandharpur Live Video News Updates

  

Pandharpur Live Onlin: लग्नात भूक लागताच नवरीला तिच्या रूममध्ये तुम्ही खाताना पाहिलं असेल किंवा लग्नाच्या जेवणात आवडत्या पदार्थांवर फुडी नवरीने ताव मारतानाही पाहिलं असेल. पण सध्या अशा नवरीचा व्हिडीओ समोर आला आहे, जिने हद्दच केली आहे. लग्नमंडप सोडून नवरी चक्क बर्गर किंगमध्ये पोहोचली आहे. प्रत्येक नवरीला नटल्याथटल्यानंतर आपलं लग्न कधी होतं, याची उत्सुकता असते. त्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत असते.


लग्नघटिकेची तिला प्रतीक्षा असते. पण ही नवरी मात्र नटूनथटून लग्नासाठी उभी राहिली नाही तर बर्गर किंगमध्ये बर्गर खाण्यासाठी गेली.



आपल्यापैकी बहुतेकांना बर्गर आवडतो. अशीच ही नवरीसुद्धा बर्गर लव्हर आहे.

या फुडी नवरीने तर हद्दच केली (Bride eat burger). त्यामुळे अगदी आपल्या लग्नाच्या दिवशीसुद्धा बर्गर खाण्याचा मोह ती आवरू शकली नाही. लेहंगा चोली, डोक्यावर ओढणी आणि दागिने घालून ही नवरी बर्गर किंगमध्ये गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तर तिला बर्गर किती आवडतो आणि तिला किती भूक लागली आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.


..................

या नवरीला पाहून तर वाटतं तिला बर्गरपेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. विटी वेडिंग (Witty Wedding) इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

Post a Comment

0 Comments