Pandharpur Live Online: शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. पूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं की, युतीत आमची 25 वर्षे सडली! नंतर आता भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ''युतीत श्वास कोंडत असल्याची'' प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
...................

.......
................

................
.................
राज्यात युती असताना अनेक ठिकाणी पक्ष विस्तार करताना काही अडचणी येत होत्या, श्वास कोंडत होता अशी कडवट टीका भाजपाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील पक्षाचे सरकार असल्याने भाजपला आता मोठी संधी आहे जशा आशा बुचके तुमचा श्वास कोंडत होता तसा आमचाही काही ठिकाणी श्वास कोंडत होता असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

0 Comments