पुराच्या पाण्यात शेतकरी बैलगाडीसह गेला वाहून... शेतकऱ्याचा मृत्यू; बैल मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले!

Pandharpur Live Online: अमरावती जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरु आहे. तर बुधवारी दुपारी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील अनेक नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. आज जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना समोर आली आहे, एक वयोवृद्ध शेतकरी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

.......

................

................

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात असलेल्या विरुळ रोंघे येथील वयोवृद्ध शेतकरी श्रावण लांजेवार शेतातुन घरी परत होते. तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. रोंघे रामगाव शिवारातील पाझर नाल्यातून बैलगाडी काढत असताना नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीसह वाहून गेले.  काही अंतरावर मृतदेह गावकर्‍यांना दिसून आला. त्यांच्या आकस्मित मृत्यूने विरुळ रोंघे गावात शोककळा पसरली आहे.

दोरखंड तुटल्याने बैल बचावले

तेव्हा विरुळ रोंघे रामगाव शिवारातील पाझर नाल्यातून बैलगाडी काढत असताना नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात बैलगाडीसह श्रावण वाहून गेले. दोरखंड तोडल्याने बैल बाहेर पडले. मात्र काही अंतरावर श्रावण यांचा मृतदेह गावकऱ्यांना दिसून आला. श्रावण यांच्या आकस्मित मृत्यूने विरुळ रोंघे गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments