स्पर्धेतील तीन गटातून १५ विद्यार्थी विजेते घोषित करण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आज मंगळवार, दि.१७.०८.२०२१ रोजी मा.सौ.सीमाताई प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. विजेत्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
कथाकथन स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यामध्ये इ.१ ली ते ४ थी गटात १.शिवेंद्र गणेश गोडसे २.वेदिका प्रविदत्त वांगीकर ३.कृष्ण दिगंबर शिंदे व तनुश्री तुषार खंडागळे तर उत्तेजनार्थ शारदा वृद्धेश्वर नगरकर यांना पुरस्कार देण्यात आला.
कथाकथनमध्ये इ.५वी ते ७वी गटात १.अमेय नितीन रत्नपारखी २.समृद्धी सचिन ताठे व राधिका रामचंद्र देशपांडे ३.स्निग्धा सुजित शेळके उत्तेजनार्थ उर्वी संतोष डोंगरे यांना पुरस्कार देण्यात आला आणि वक्तृत्व मध्ये इ.८ वी ते १० वी गटात १.सार्थक शरद पवार २.संविधान राजेंद्र नागटीळक ३.ध्रुव ऋषिकेश उत्पात तर उत्तेजनार्थ स्वरूप समीर दिवान यांना पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.सीमाताई परिचारक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तसेच प्रशालेच्या प्राचार्या सौ.सोनाली पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याच दिवसाचे औचित्य साधून कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील २०२०-२१ च्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. निरोप समारंभावेळी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली उपस्थित दर्शवून आपले मनोगत मांडत शिक्षणाबद्दलची आत्मियता व्यक्त्य केली.
प्रशालेमध्ये शालेय जीवनातील संपूर्ण आठवणी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या. यावेळी सर्व पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.सीमाताई परिचारक व प्रशालेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.योगिनी ताठे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.संध्या उकरंडे यांनी आणि संपूर्ण कार्यक्रमाकरिता कर्मयोगी विद्यानिकेतनचे शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments