Parali Taluka: (पोहनेर ) पोहनेर शिवारातील वरुणराजाच्या आगमनाने पोहनेर शिवारातील शेतकरी सुखावला. पोहनेर शिवारातील २० ते २२ दिवसापासून शेतकरी आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल या प्रतिक्षेत होता. पण आज वरुणराजाचे आगमन झाल्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहॆ .
सोयाबीन, कापूस, तुर इत्यादी पिकाला बहरण्याच्या काळातच पाऊस हुलकावणी देत होता. या मुळे शेतकरी खुप मोठ्या चिंतेत होते. आपले खुप मोठे नुकसान होते की, काय वर्गाला वाटत होते. मागच्या पंधरा ते बावीस परिस्थिती सोयाबीन, कापूस, तुर,मुग इत्यादी पीके बहरण्याची होती.
.............
.....................
या परिस्थितीत सोयाबीन पिकाला फुले लागण्याच्या स्थिती सोयाबीन होत्या. तसेच कापूस पिकाला फुल व पाते लागत होते. या मुळे शेतकरीवर्गआपले खुप मोठे नुकसान होते की, या धास्तीत होता परंतु आज जो पाऊस झाला आहे. तो पैशाचा पाऊस झाला आहे! असे पोहनेर शिवारातील शेतकरी वर्गात बोलले जात असून या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.
0 Comments