Pandharpur Live Video News Updates
Pandharpur Live Online:
जिल्हा परिषदेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या प्रकरणात शालेय शिक्षण मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून याचा मोठा फटका वैशाली झनकर यांना सहन करावा लागणार आहे. अद्याप त्या गायब असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निष्काळजीपणामुळे त्या फरार झाल्याचं सांगितलं जात आहे.

वैशाली झनकर वीर यांच्या कृत्यामुळे सरकारची प्रतिमा मलील झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात वैशाली वीर यांचं सरकारडून निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरोधात सेवा तरतुदीनुसार शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे निलंबन प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे शिक्षण आयुक्तांना आदेश दिले आहेत.

.......................

वैशाली झनकरांची लाखोंची संपत्ती
बुधवारी नाशिकमध्ये 8 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी एका महिला शिक्षणाधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. झनकर यांच्या नावावर शहरातील शिवाजीनगर भागात, गंगापूररोड, मुरबाड, गंधारे कल्याण असे प्रत्येकी एक याप्रमाणे चार फ्लॅट आहेत. सिन्नरमध्ये 0.57 गुंठे, कल्याण-मिलिंदनगरमध्ये 31.70 गुंठे, 10.8 गुंठे, 40.80 गुंठे, 13.10 गुंठे तर सिन्नर येथे 0.56 गुंठे, 3.41 गुंठे, 22.70 गुंठे, अशी एकूण सुमारे 123.64 गुंठे म्हणजेच सुमारे 3 एकर अशी स्थावर मालमत्ता आढळून आली आहे. 40 हजारांची रोख रक्कम आढळली असून एक होंडा सिटी कार, एक ॲक्टिवा दुचाकी अशी वाहनं आहेत.

अटक टाळण्यासाठी धावाधाव
तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणानंतर फरार असलेल्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांनी आता अटक टाळण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. यासाठीच त्यांनी अकटपूर्व जामीनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला आहे. झनकर-वीर यांच्या वतीने अॅड अविनाश भिडे यांनी नाशिक न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या अर्जावर जिल्हा न्यायालयात न्यायमूर्ती एम एच शेख यांच्या समोर उद्या (शुक्रवार, १३ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या सध्या फरार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. आठ लाख रुपयांची लाच घेताना त्यांच्यासह त्यांचा वाहन चालक आणि प्राथमिक शिक्षक हे रंगेहाथ पकडले गेले. त्यानंतर जवळपास ९ तासांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र, झनकर-वीर यांनी पोलिसांना गुंगारा दिला. त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. तर अन्य दोन आरोपी हजर झाले. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. झनकर-वीर या फरार असताना आता त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
.......


0 Comments