पुण्यात पोलिसांचे कोंबीग ऑपरेशन; ५५ गुन्हेगारांना अटक; १ पिस्तुल, ३१ कोयते, ४ तलवार जप्त!



 Pandharpur Live Video News Updates

......................

...........................

Pandharpur Live Online: स्वातंत्र्यदिनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात पुणे पोलिसांची गुन्हेशाखा व प्रत्येक पोलिस ठाण्यातील पथकांकडून कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडती करण्यात आली. त्यानुसार 2 हजार 389 गुन्हेगारांची कुंडली तपासणी करण्यात आली. त्यापैकी 819 गुन्हेगार मिळून आले. त्यामध्ये 308 आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

शहरभरात कोंबींग ऑपरेशन करून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. त्यानुसार हॉटेल, लॉज, ढाबे, एसटी व बस स्थानके, रेल्वे स्थानक तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्या संशयीत व्यक्तीसह परिसरातील गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली. बुधवारी रात्री 9 ते मध्यरात्री एकच्या सुमारास कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. 

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुल बाळगणाऱ्यावर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आली. हत्यार बाळगल्याप्रकारणत 37 गुन्हे दाखल करून ३७ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 31 कोयते, चार तलवारी, एक सुरा जप्त करण्यात आला.

गुन्हेशाखेने तीन आणि पोलिस ठाण्यातंर्गत सहा मिळून 9 तडीपारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय अमंली दार्थ बाळगल्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये तीन जणांना अटक करून त्याच्याकडून 2 किलो 335 किलो गॅ्रम गांजा जप्त करण्यात आला.

974 ग्रॅम गांजा बाळगल्या प्रकारी विमानतळ पोलिसांनी दिपक मल्लेश देवकर (वय 25, रा. इंदीरानगर, झोपडपट्टी लोहगाव) याला अटक केली. दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अभिजीत सुभाष गोरविले (20, रा. शिवदर्शन पर्वती) यांच्याकडून 560 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, उपायुक्त सागर पाटील, उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, उपायुक्त पंकज देशमुख, उपायुक्त नम्रता पाटील यांनी केली.

.......

Post a Comment

0 Comments