

Pandharpur Live Online: सरकारने आमच्या देवांना बंदिस्तच करुन ठेवण्याचा निर्णय घेतल्याने, येत्या श्रावण सोमवारी वेरुळ च्या ज्योतिर्लिंगांसमोर ठिय्या आंदोलन करणार, अशी घोषणा भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
मुंबई : गेल्या अनेक महिन्यापासून राज्यातील मंदिरे बंद आहे. मात्र सुरु करण्यात यावीत यासाठी विरोधी पक्षाकडून मागणी केली जात आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची संख्या कमी होत असली तरी, तीसऱ्या लाटेची शक्यता आहे, त्यामुळे मंदिरं सुरु करण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही, मात्र अश्यातचं आता आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
७५ व्या स्वातंत्र्य दिनी तरी आमच्या देवांना स्वातंत्र्य मिळेल ही अपेक्षा होती, मात्र या त्रिपुरासुर सरकारने आमच्या देवांना बंदिस्तच करुन ठेवण्याचा निर्णय घेतल्याने, येत्या श्रावण सोमवारी वेरुळ च्या ज्योतिर्लिंगांसमोर ठिय्या आंदोलन करणार, अशी घोषणा भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे
0 Comments