पठ्ठयाने दुचाकीच्या डिक्कीतून सोने पळवले! अर्ध्याच तासात पोलीसांनी पकडले !!


........................

 

..........................

Pandharpur Live Online: शहरातील गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यानजीक उभी केलेल्या दुचाकीची डिक्की उघडून 11 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक केले. बाबा लक्ष्मण बनपट्टे रा. बुधवार पेठ असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार हाटकर यांनी तक्रार दिली आहे.

मुलीला कपडे घेण्यासाठी 15 ऑगस्टला ओंकार हाटकर दुचाकी लक्ष्मी रस्त्यावर उभी करून तुळशीबागेत गेले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडून 11 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग तपास करीत होेते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे हा गुन्हा सराईत बाबा बनपट्टे याने केल्याची माहिती पोलीस अमलदार संदीप कांबळे, समीर माळवदकर आणि अभिनव चौधरी यांना मिळाली.

....................


 त्यानुसार पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बनपट्टे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, एपीआय मनोज अभंग, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, समीर माळवदकर, सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, महावीर वलटे, राकेश क्षीरसागर, ऋषीकेश दिघे, वैभव स्वामी, मोहन दळवी, गणेश आटोळे यांनी केली.

Post a Comment

0 Comments