सांगोला तालुक्यात कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम

खर्डी अमोल कुलकर्णी:-सांगोला तालुक्यातील महिम येथील श्री सिद्धनाथ मंदिर येथे कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टी कार्यक्रम हा घेण्यात आला. दूध उत्पादन आणि ऊस अशा माध्यमातून पंतांनी अनेक तालुक्यातील शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न हाताळले होते.त्यामुळे जिल्ह्यात त्यांना मानणारा एक गट तयार झाला होता. 

ग्रामस्थ व ऊस उत्पादक सभासद आणि वाहन मालक यांच्यावतीने दि. 17 ऑगस्ट रोजी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.पसायदान  म्हणून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी ऊस उत्पादक सभासद दिगंबर येडगे सोमनाथ पाटील, बापूराव कारंडे, सिताराम शिरगिरे,विजय मरगर दिलीप मरगर ,फुलचंद मरगर,वाहन मालक श्री यशवंत कारंडे,दत्तात्रय घोगरे,मोहन रुपनर,सोमनाथ सुरवसे विकास बेंदगुडे,सचिन झाडे,तानाजी कोळेकर,कल्याण शेंडगे,नागेश लोखंडे उपस्थित होते.

........................

......

सदर कार्यक्रमास युटोपियन शुगर चे मुख्य शेती अधिकारी मा.श्री.धनंजय व्यवहारे सो.सांगोला गटाचे ॲग्री ओव्हरसियर मा.श्री.संतोष कुलकर्णी सो. व शेतीखात्याचे धनंजय राऊत, तानाजी वगरे आणि अनिल धुमाळ उपस्थित होते.सदर कार्यक्रमानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

ग्रामस्थांनी कोरोना चे नियम पाळून कार्यक्रम पार पाडला.

Post a Comment

0 Comments