स्वेरी फार्मसीचा केबीपी महाविद्यालयासोबत सामंजस्य करार


पंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी) आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयपंढरपूर चा वनस्पतीशास्त्र विभागयांच्यात नुकताच सामंजस्य करार स्थापित करण्यात आल्याची माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांनी दिली.

       या सामंजस्य करारामुळे बी. फार्मसी मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग यांना वनस्पतीशास्त्र या विषयावरील संशोधन प्रकल्पांसाठी मदत होणार आहे व कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयास वनस्पतींपासून औषधनिर्माण करण्यास मदत होणार आहे. 

हा सामंजस्य करार २०२१-२२ ते २०२३-२४ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. हा करार पूर्ण होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्र.प्राचार्य डॉ. मिथुन मणियारप्रा. वृणाल मोरेप्रा.अनिल लांडगे व प्रा. स्नेहल चाकोरकर यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. 

यावेळी के. बी. पी. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.मारुती सातपुते, डॉ. सचिन थिटेनिलेश पाटील व स्वेरी फार्मसीचे प्र. प्राचार्य डॉ.मिथुन मणियारप्रा. अनिल लांडगेप्रा. स्नेहल चाकोरकर आदी उपस्थित होते. हा करार करण्यात आल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पसचे इनचार्जस्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तिन्ही महाविद्यालयांचे प्राचार्यअधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments