पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे दाखल असलेला गु. र.नं. 314/2021 भा. द. वि. क. 302, 201 मध्ये अनिल हनुमंत सावंत वय 35 वर्ष रा. पिराची कुरोली यास आज रोजी LCB ने ताब्यात घेतले होते. संयुक्तरित्या विचारपुस नंतर ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने गुन्ह्याचा घटनाक्रम, गुन्ह्याकामी वापरलेल्या वस्तु, विहिरीत टाकलेली बॉडी, पुरावा नस्ट करण्याचा केलेला प्रयत्न, त्याचे वर्तन आणी त्या अनुषंगाने पोलीसांनी केलेली पडताळणी वरून आरोपीचा सहभाग दिसुन आल्याने तसेच आरोपीची सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत खात्री केल्यानंतर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदर आरोपीस या गुन्ह्यात काल रात्री अटक केली आहे.
आरोपी अनिल हनुमंत सावंतआज रोजी नमूद अटक आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार दि. 23.08.2021 पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ
.................
पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे अधिक तपास करण्यात येणार असून आरोपीने मृतक यास जिवे मारण्याचा हेतू उद्देश काय, आरोपीने नक्की कशाने मारले, मृतकचे कपडे यांचा शोध घेणे, मृतक चपलांचा शोध घेणे, आरोपीला मदत करण्यास आणखी कोणाचा सहभाग आहे काय याबाबत तपास करण्यात येणार आहे.
एल. सी. बी. पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक मांजरे, पो. हवा. गोलेकर, गाडे, हवालदार, भोगे, पो. कॉ. दळवी, शेख यांचा समावेश होता.
पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पो.उप.नी गोदे, पो. हवा. शेंडगे, जाधव, शेख, पो. ना. सय्यद यांचा सहभाग आहे.
.....................
...................
Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ
.................
.................
.....................
0 Comments