Pandharpur Live Online: महात्मा गांधी आणि काँग्रेस परिवारातील व्यक्तींची बदनामी केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री पायल रोहतगी हिच्या विरोधात पुणे येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार पायल रोहतगी आणि तिचा व्हिडिओ तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता तिवारी यांनी दिलेल्या फिर्यादीत महटले आहे की, महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटंबिय, काँग्रेस परीवार यांच्याबाबत पायल रोहतगी हिने अपमानास्पद आणि खोटा तसेच बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला आहे. संगिता तिवारी यांनी आपली फिर्याद सायबर पोलिसांकडे दिली आहे. सायबर पोलिसांनी ही तक्रार शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे.

पायल रोहतगी हिने या आधीही काँग्रेस आणि नेहरु कुटुंबीयांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. या प्रकरणात तिला मागे अटकही झाली होती. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करायची. प्रकरण पुढे न्यायालयात गेले की माफी मागून प्रकरणावर पडदा टाकायचा. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर असेच काहीतरी वादग्रस्त टाकायचे असे पायर रोहतगी हिच्याकडून या आधीही घडल्याचे सांगितले जाते.


0 Comments