
डॉ. स्वरूपसिंह हजारी (वय अंदाजे ६०) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हजारी हा धारूर नगरपालिकेत सध्या नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून धारूरमध्येच खाजगी दवाखाना चालवतो. मंगळवारी दुपारी १९ वर्षाची गर्भवती तपासणीसाठी आली होती.

यावेळी तिला सोनोग्राफी करायची असा बहाणा दाखवत मध्ये नेले. काही वेळातच डॉक्टरने तिच्याशी लगट करत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला. हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व ॲट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे करीत आहेत.

डॉक्टर आणि व्यापारी असोसिएशन चा बंद
धारुर येथील डॉक्टर असोसिएशनने हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. आज असोसिएशन च्या सर्व डॉक्टरांनी आपले वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवले असून व्यापारी असोसिएशन सुद्धा बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन गुन्हा तात्काळ गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे.


0 Comments