‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सायंकाळची पुजा व आरती वैभव ऑईल मिलचे संचालक श्री.कांतीलाल सुपेकर यांचे शुभहस्ते संपन्न


 
Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजीची सायंकाळची पुजा व आरती इसबावी, पंढरपूर येथील वैभव ऑईल मिलचे संचालक श्री.कांतीलाल सुपेकर यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.

यावेळी श्री.कांतीलाल सुपेकर यांनी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी विघ्नहर्ता श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी श्री.कांतीलाल सुपेकर यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी समाजसेवक ओंकार बसवंती, चि. श्‍लोक नरेंद्र सुपेकर, पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी हर्षद कोळी आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments