‘पंढरपूर लाईव्ह’ च्या कार्यालयातील ‘श्री’ ची आज सकाळची पुजा व आरती पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री.विक्रम कदम यांच्या शुभहस्ते संपन्न

 


Pandharpur Live: ‘पंढरपूर लाईव्ह’  कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजीची सकाळची पुजा व आरती पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री.विक्रम कदम यांचे शुभहस्ते विधीवत संपन्न झाली.


यावेळी श्री.विक्रम कदम यांनी ‘पंढरपूर लाईव्ह‘ च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.



लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी श्री.विक्रम कदम यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे उपसंपादक विजयकुमार गायकवाड, समाजसेवक ओंकार बसवंती, शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख सौ.आरती ओंकार बसवंती, पंढरपूर लाईव्हचे प्रतिनिधी प्रितीश चव्हाण व हर्षद कोळी आदी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments