*सिंहगड मध्ये "इनोव्हेटिव्ह रिसर्च इन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स" या विषयावर ऑनलाईन वेबिनार*
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभाग व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांसाठी "इनोव्हेटिव्ह रिसर्च इन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स" या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या वेबिनार मध्ये डॉ. टी.सी. मंजुनाथ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. टी.सी. मंजुनाथ यांनी नवीन तंत्रज्ञानामधील पावर इलेक्ट्रॉनिक चे महत्व व उपयोग या विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. हा वेबिनार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला असल्याची माहिती विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. आर. एम. पाटील यांनी दिली.
या वेबिनार मध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापिका अनिता शिंदे यांनी केले तर आभार उपस्थितांचे आभार प्राध्यापक दत्तात्रय कोरके यांनी मानले.
0 Comments