स्वेरी फार्मसीच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश !



स्वेरी फार्मसीच्या तेरा विद्यार्थ्यांचे जी-पॅट परिक्षेत यश !

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित औषधनिर्माण शास्त्र (बी. फार्मसी) महाविद्यालयातील तब्बल १३ विद्यार्थ्यांना जी-पॅट (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०२२ या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       स्वेरी संचलित औषधनिर्माणशास्त्र तथा बी. फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे मोहिनी संतोष जमदाडे (रँक क्र.- ८७८), आकांक्षा बाळासाहेब शिंदे (रँक क्र.-१११६), प्राजक्ता महादेव साळुंखे (रँक क्र.-१६७४), पूजा शामराव लोखंडे (रँक क्र.-२७२२), स्मिता दत्तात्रय लोंढे (रँक क्र.-२९००), पल्लवी सुधाकर हाके (रँक क्र.-३८७०), प्रतिक जालिंदर जाधव (रँक क्र.-४३५५), रोहिणी बाळासाहेब ओव्हाळ (रँक क्र.-४३९१), प्रमोद बाबू बिराजदार (रँक क्र.-४५३३), अजित दाजी खिलारे (रँक क्र.-९९५०), प्राजक्ता गोरख जानकर, शुभम संजय काळे व संकेत उत्तम रेपाळ अशा एकूण १३ विद्यार्थ्यांनी  एम. फार्मसीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी ए.आय.सी.टी.ई.अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील अतिशय अवघड परंतु आवश्यक असणाऱ्या जी-पॅट या परिक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.


 स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशाद


र्शक मार्गदर्शनाखाली, बी.फार्मसीचे प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली तसेच उच्च शिक्षित प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि जानेवारी २०२२ रोजी झालेल्या या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे पंढरपूर पंचक्रोशीत कौतुक होत आहे. सन २००६ साली स्थापन झालेल्या बी. फार्मसी महाविद्यालयाने प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या उज्वल यशाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. सन २०१० साली ‘संतोष गेजगे’ या विद्यार्थ्याने याच जी.पी. ए. टी. परीक्षेत भारतात ११७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यशाचा पाया खणला होता. तेथून पुढे प्रत्येक वर्षी स्वेरीच्या बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी जी-पॅट मध्ये भरघोस यश संपादन करण्याची परंपरा कायम राखली असल्याचे या निकालावरून दिसून येते. यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षकांबरोबरच ‘पंढरपूर पॅटर्न’ व रात्र अभ्यासिकेला देखील देतात. मिळालेले यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे, हे मात्र निश्चित! सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बी.फार्मसी प्रभारी प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, प्रा.रामदास नाईकनवरे, डॉ.वृणाल मोरे, प्रा. स्नेहल चाकोरकर प्रा.प्रदीप जाधव, प्रा.सविता शिंपले आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments