Pandharpur Live : पंढरपूर येथील एम. एस. ई.बी चे सेवानिवृत्त कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तथाआर्मी जवान विक्रम नाईकनवरे यांचे वडील दिवंगत राजाराम महादेव नाईकनवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे कुटुंब ,नातेवाईक, व पंढरपूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे निवासस्थानी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ही घेण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे, पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवानराव वानखेडे, दीपक नाईकनवरे. यांनी आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य भगिरथदादा भारत भालके माजी नगरसेवक अंबादास वायदंडे , दीपक राजाराम नाईकनवरे, कैलास जाधव आदींनी आदरांजली वाहिली.
दिवंगत.राजाभाऊ नाईकनवरे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त अभिवादन करताना आमदार समाधान आवताडे. नगरसेवक डी. राज सर्वगोड, समाजकल्याण सभापती सचिन शिवशरण, आण्णा धोत्रे, दिपक नाईकनवरे व इतर उपस्थित होते.
रुक्मिणी परिवाराच्या नेत्या सुनेत्राताई पवार यांनी आदरांजली अर्पण केली.आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त नानासाहेब वाघमारे,प्रदिप रणदिवे, दशरथ यादव, दिपक नाईकनवरे यांनी आदरांजली अर्पण केली.नगरसेवक संजय निंबाळकर अँड. बादल यादव, संजय अडगळे अनिल कांबळे (पुणे )धंनराज खिलारे, जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, दत्तात्रय खिलारे यांचेसह पंढरपूर शहर आणि तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक या व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहून दादांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
0 Comments