जुन्नर मानमुकुड बुद्ध लेण्यांचे तातडीने संवर्धन करा !



 जुन्नर मानमुकुड बुद्ध लेण्यांचे तातडीने संवर्धन करा ! 

एकजूट लेणी अभ्यास प्रचारक संवर्धकांची मागणी 

जुन्नर ( दि. १३ जून २०२२)  : 

लेणीसमूह जुन्नरमध्ये सर्वाधिक बुद्धकालीन लेण्या आहेत. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या जागतिक वारसाची दुरवस्था आहे. त्याची पुरातत्व विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि तातडीने संवर्धनाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी एकजूट लेणी संवर्धकांनी यावेळी केली.


किल्ले शिवनेरी, लेण्याद्रीसह जुन्नर लेणी समूहात जवळपास अडीजशे बुद्धकालीन लेण्या आहेत. 

एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूहाने ( रविवारी दि.१२ जून) रोजी जुन्नर मानमुकुड बुद्धलेणी अभ्यास कार्यशाळा मुख्य आयोजक सारिश डोळस (दादूस) यांच्या उपस्थित संपन्न झाली. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन ऍड. विशाल वाघमारे यांनी केले. तर  अभ्यास दौऱ्यात भंते पुर्ण,भंते राहुल,भंते वप्प,भंते अश्वमेध,भिक्खूनी आर्य जी उत्पलवर्णा, भंते ब्रम्हरत्न भिक्खू संघ सहभागी झाले होते. 



बोधिसत्व चैनलचे प्रमुख सागर कांबळे यांनी उपस्थितांना लेणी आणि बुद्ध संस्कृतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मावळ लेणी संवर्धन ग्रुपचे ‌समाधान सोनवणे, मनोज गजभर, एमबीसीपीआर ग्रुपचे धम्मलिपि अभ्यासक संतोष वाघमारे,

धम्मलिपि अभ्यासक आनंद खरात, जुन्नर लेणी टिमचे गणेश वाव्हळ, गणेश सोनवणे, प्रज्वल भालेराव, 

डॉ. उमेश वाघंधरे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.


व्यवस्थापक विवेक वाघमारे, सुर्यकांत साळवी, वेदांत मोरे, सयाजीराव कांबळे, कुमार बनसोडे,

बाल लेणी संवर्धक श्रावस्ती वाघमारे , भुमिका डोळस आदिंनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. या कार्यशाळेत मुंबई, पुण्यातून मोठ्या संख्येने लेणी संवर्धक आणि अभ्यासक सहभागी झाले होते.

------------------/---------------




अधिक माहिती 

श्रीकांत जाधव

9167952092

Post a Comment

0 Comments