*समविचारी संघटना सोबत घेऊन सत्ता संपादन करणार*-- *अनिल कादे*

 


*समविचारी संघटना सोबत घेऊन सत्ता संपादन करणार*-- *अनिल कादे*

*पंढरपूर येथे शिक्षक समितीची संवाद बैठक*

---------------------------------------------

पंढरपूर  ( दि. १३ ) सोलापूर  जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमध्ये अमुलाग्र बदल घडविण्यासाठी नव्या विचाराने कार्य करणारे संचालक निवडून देण्याची आवश्यकता आहे . इतर जिल्ह्यातील शिक्षक बँकांनी  शिक्षकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे . जिल्ह्यातील सर्व समविचारी घटकांना सोबत घेऊन जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या निवडणूकीत सत्ता परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षक समितीच्या  कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी केले .

         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पंढरपूर  शाखेचा संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी कादे यांनी पंढरपूर  तालुक्यातील  शिक्षक समितीच्या  नव्या जुन्या पिढीतील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने  शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन  शिक्षक समुदायाचा विश्वास संपादन केला आहे . आगामी निवडणूकांत शिक्षक समितीची ताकद पंढरपूर तालुक्यात देखील वाढल्याचा प्रत्यय मतदान रुपाने येणार असून समाविचारी इतर संघटना सोबत घेऊन यशा संपादन करण्याचा  विश्वास व्यक्त केला . 



      यावेळी जिल्हा सरचिटणीस आमोगसिद्ध कोळी , राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र नवले शिक्षक समितीचे शिक्षक नेते सुरेश पवार , डाॕ. सचिन लादे , राजन ढवण , तालुकाध्यक्ष सुनिल कोरे , जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे ,आण्णासाहेब रायजादे उपाध्यक्ष    सुनिल अडगळे तालुका सोसासटीचे चेअरमन बलभिम जाधव कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे मा.चेअरमन आवेश करकमकर बालाजी शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधून मार्गदर्शन केले .

       यावेळी व्यासपीठावर पुणे विभागीय अध्यक्ष तथा जिल्हा सोसायटीचे माजी चेअरमन दयानंद कवडे , माजी चेअरमन विकास उकीरडे , माजी चेअरमन भारत कुलकर्णी , जिल्हा सल्लागार अनिल बंडगर उपाध्यक्ष गोविंद कुलकर्णी पुरोगामी शिक्षक सोसायटीचे चेअरमन विजय जाधव प्रसिद्धी प्रमुख देवीदास जगताप सहसरचिटणीस संचालक राजाभाऊ खपाले हेमंत माने मा.चेअरमन गुंडिबा कांबळे पुरुषोत्तम उत्पात उदय भूमकर  ज्ञानेश्वर दुधाणे संघटक अविनाश बुरांडे शिक्षक नेते शिवानंद बिराजदार एकनाथ सुतार संतोष कापसे प्रकाश राऊत अशोक शिंदे रवि नरळे व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होते .

          यावेळी प्रास्तविक तालुका सरचिटणीस पोपट कापसे यांनी केले . जिल्हा प्रतिनिधींच्या सूचनेवरुन निवडणूकी संदर्भात नियोजन करुन उमेदवार ठरविणे व रुपरेषा निश्चित करण्यासाठी ११ सदस्यांची सुकाणू समिती गठीत करण्यात आली. या सभेचे सूत्रसंचलन  कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी केले तर शेवटी सुनिल आडगळे यांनी आभार मानले. यावेळी तालुक्याच्या सर्व केंद्रातून क्रियाशील १२५ हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते .

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*जय शिक्षक समिती*

Post a Comment

0 Comments