पंढरपूर: प्रमोद बनसोडे
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या कुमारी कोमल वागंधरे यांची "ईवायजीडीएस" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
"ईवायजीडीएस" हि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनी असून जगातील १५० देशात मध्ये कार्यरत असुन ७०० पेक्षा ऑफिसेस आहेत. या कंपनीचे भारतात मध्ये ४४ हजारांहून अधिक इंजिनिअर काम करत आहेत. हि कंपनी रोबोटिक प्रोसेस ॲटोमेशन या मध्ये मार्केट प्रमुख म्हणून प्रसिद्ध आहे. याशिवाय हि कंपनी ब्लॉकचेन च्या प्रकल्पाला ग्राहकाला सोल्युशन देते तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्लॉकचेन, रोबोटिक्स आणि साॅफ्टवेअर क्षेत्रात उल्लेखनीय सेवा प्रदान करत आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेल्या उपळाई (ता. बार्शी) येथील कुमारी कोमल राजेंद्र वागंधरे हिची "ईवायजीडीएस" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असुन कंपनीकडून वार्षिक ४.५० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
"ईवायजीडीएस" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
0 Comments