कठोर परिश्रमाची तयारी, आत्मविश्वास व प्रचंड इच्छाशक्ति हे गुण अंगी असतील तर आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कोरोंना कालावधी नंतर प्रथम च घेण्यात येणार्या अभियांत्रिकी च्या ऑफलाइन परीक्षेसाठी आत्मविश्वासाने सामोरे जा, यश तुमचेच आहे असे प्रतिपादन कर्मयोगी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनीअरिंग), शेळवे चे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी केले. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने विद्यार्थ्यांसाठीच्या आयोजित केलेल्या विविध गुण गौरव कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला.
तसेच विद्यापीठाच्या प्रथम वर्ष प्रथम सेमिस्टर मध्ये यश मिळविलेल्या प्रत्येक विभागातील तीन टॉपर्सं विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला. यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागामध्ये वैभव काजेवाड (94.8%), तुषार भोसले (94.4%), प्राची भाग्यवंत (93.6%) तसेच सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील यश भोसले (92.27%), सोमनाथ सुएवसे (91.87%), अथर्व रोकडे (91.60 %) तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनीअरिंग विभागातील राजश्री बक्कनवार (94.67 %), प्रज्ञा पाटील (94.13 %), रुद्राक्ष बिराजदार (93.20 %) तसेच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील मनीषा म्हेत्रे (98.24 %), शुभम कदम (97.88%), संजीवनी बाबलसुरे (97.18%) या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला.
या वेळी प्रथम वर्षात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या तर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या योगा स्पर्धेमध्ये रुद्राक्ष बिराजदार, जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये ऋषिकेश देवकर तर धावण्याच्या स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर मयूर नाईकनवरे या विद्यार्थ्यानी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमा मध्ये सर्व उपस्थितांना तेज ज्ञान फाउंडेशन, पंढरपूर यांच्या वतीने “विचार नियम- आशा आणि विश्वास” हे पुस्तक भेट देण्यात आले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. ए ए देशमाने यांनी सूत्रसंचाल केले तर प्रा. एस जे सावेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
0 Comments