पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज सायंकाळची 'श्री' ची पुजा व डॉ. दादासाहेब नागणे यांचे शुभहस्ते संपन्न



पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.



आज सायंकाळची 'श्री' ची पुजा व आरती  महात्मा फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय शैक्षणिक विकास संस्था वाखरी ऋषी बहुउद्देशीय शैक्षणिक विकास संस्था वाखरी अंतर्गत राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूल वाखरी, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग इंदापूर या संस्थांचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ.श्री.दादासाहेब नागणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. 



यावेळी त्यांनी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी श्री.नागणे यांनी गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी समाजसेवक नागनाथ पवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments