मुंबईतील अंधेरी परिसरात खळबळजनक घटना घडली.
आकांशाचे इन्स्टाग्रामवर जवळपास 11 हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. आकांशानं तिच्या इन्स्टाग्रामवरील बायोमध्ये तिनं इंजिनिअरिंग आणि एमबीए केलं आहे,असं लिहिलं आहे. तसेच आकांशा ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत होती. वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ आकांशा सोशल मीडियावर शेअर करत होती. तसेच आकांशा तिचा डाएट प्लॅन देखील सोशल मीडियावर शेअर करत होती. आकांशाला नृत्याची देखील आवड होती. वेगवेगळ्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ आकांशा शेअर करत होती.
आकांशा ही अंधेरी पश्चिम परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होती. वर्सोवा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आकांशानं हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (29 सप्टेंबर) हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. अनेक वेळा बेल वाजवूनही रुमचा दरवाजा उघडला नाही. वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने तात्काळ पोलिसांना फोन करुन कळवलं



0 Comments