माणसाची गरज ही संशोधनाची जननी असते, हे इतिहासापासून शिकायला मिळतं. सोशल मीडियाच्या जन्मापासून अनेक वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळतात.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये, एक आई रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहे, परंतू या व्हिडीओतील खास गोष्ट म्हणजे आईने मुलासाठी बनवलेले नाविन्यपूर्ण बॅकसीट..., आईने देशी जुगाड करत आपल्या चिमुकल्यासाठी बॅकसीट तयार केली.
आईने आपल्या पोटच्या लेकरासाठी एक सायकलच्या कॅरियरला एक छोटी खुर्ची बांधली त्यामुळे तिच्या बाळाला आरामात प्रवास करता आला. दोन्ही माय लेकरू आरामात प्रवास करताना दिसून येत आहेत. फक्त 9 सेकंदाचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला देखील आहे. आईने केले्ल्या जुगाडामुळे बाळाला आरामात राजकुमारासारखं फिरता आलं.



0 Comments