विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

पंढरपूर, ( दि.30):- राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे  यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले.


यावेळी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देवून उपसभापती डॉ.गोऱ्हे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, पोलीस निरिक्षकअरुण पवार, मंदीर समितीचे लेखाधिकारी अनिल पाटील यांच्यासह मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments