पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील आज सकाळची 'श्री' ची पुजा व आरती भाजपा शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे-नाईक यांचे शुभहस्ते संपन्न


 पंढरपूर लाईव्ह: सालाबादप्रमाणे या वर्षीही पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.  असून पंढरीच्या विविध क्षेत्रातील गुणीजण मान्यवरांच्या शुभहस्ते विघ्नहर्त्याची पुजा व आरती करण्यात येत आहे.



आज सकाळची 'श्री' ची पुजा व आरती  भाजपाचे पंढरपूर शहर उपाध्यक्ष, शिवनेरी प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.भाऊसाहेब शिंदे-नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. 



यावेळी सर्वांच्या सुख, शांती, समृध्दी व उत्तम आरोग्यासाठी श्री. शिंदे-नाईक यांनी गणरायाकडे प्रार्थना केली. तसेच पंढरपूर लाईव्ह व बातमी २४ तास च्या कार्याचं कौतुक करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल मुख्य संपादक भगवान वानखेडे व सहसंपादक विकी साठे यांनी त्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments