दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी , मग पतीचा काटा काढत मृतदेह लपवला ; पण

 

दिराच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने दीर आणि चुलत सासऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने महिलेने काढला आणि तब्बल दीड वर्षे मृतदेह लपवून ठेवला.


त्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिला. जंगलात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि अखेर महिलेची पोलखोल झाली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह चौघांना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


रामसुशील पाल असे 40 वर्षीय मयत पतीचे नाव आहे. रीवा जिल्ह्यातील उमरी गावात रामसुशील आपल्या कुटुंबासह राहत होता. रामसुशीलच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने रंजना हिच्याशी दुसरा विवाह केला होता.


विवाहाच्या दोन वर्षांनंतर रंजनाचे दिर गुलाबसोबत प्रेमसंबंध जुळले. रामसुशीलला याबाबत कळल्यानंतर दररोज पती-पत्नीमध्ये भांडण होत असे. यामुळे रंजना आणि गुलाबने रामसुशीलचा काटा काढण्याचे ठरवले. रामसुशीलच्या मृत्यूनंतर त्याची संपत्तीही आपल्याला मिळेल असे दोघांना वाटले.


रंजना आणि गुलाबने या कटात रामसुशीलचा चुलत भाऊ अंजनी, काका रामपती यांच्यासह अन्य दोघांना सामील करुन घेतले. प्लाननुसार आधी रामसुशीलला समोशामध्ये उंदिर मारण्याचे औषध मिसळून खाऊ घातले. यामुळे रामसुशीलचा मृत्यू झाला. त्यानंतर गुलाब आणि अंजनीने मृतदेहाचे दोन तुकडे करुन गोणीत भरले आणि दीड वर्ष भुशामध्ये लपवले.

Post a Comment

0 Comments