पंढरपूर: प्रतिनिधी
वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले.
सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.
त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
पंढरपूर_सिंहगड
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी (ता.पंढरपूर) येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रा. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख सह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
यादरम्यान "राष्ट्रीय एकता शफत" घेण्यात आली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, विद्यार्थी नागेंद्रकुमार नायकुडे यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments