BIGBREAKING : सांगोला मिरज मार्गावर वाहनाच्या धडकेत 6 वारकऱ्यांचा मृत्यू...पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाहनाची धडक

 


 सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सहा वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी गावाजवळ हा अपघात झाला आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना एका वाहनाची जोराची धडक बसली आहे. वाहनांच्या धडकेत सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठार वाडीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.




खरंतर सर्व वारकरी हे कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते. त्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने ज्ञानोबा-माऊलीचा जप करत पुढे सरकत होती.


या दरम्यान रसत्याने जाणारा एका टेम्पो थेट दिंडीत घुसला. या टेम्पोने अनेक वारकऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित अपघाताच्या घटनेमुळे सांगोला-मिरज मार्गावरील वाहतूक खोळंबली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. ते तातडीने घटनास्थळी गेले.


स्थानिक गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. पण या अपघातात आतापर्यंत सहा वारकर्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जनसंपर्क कक्ष ( मुख्यमंत्री सचिवालय)


*सांगोला - मिरज मार्गावरील अपघात*


*मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा*



मुंबई दि 31


कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.

 

 मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

Post a Comment

0 Comments