हसतमुख, दिलखुलास रूग्णसेवकाची चटका लावणारी एक्झिट.... पंढरीतील रूग्णसेवक रवी कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील डॉ. मेणकुदळे यांच्या हॉस्पिटलमध्ये सेवेत असलेले रूग्णसेवक रवी कांबळे (वय ४३) , रा. गादेगाव, ता. पंढरपूर  यांचे दि.२८ -१०-२०२२ रोजी रात्री दोन वाजता  अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर काल गादेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कांबळे यांच्या मित्रपरिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


त्यांच्या पश्चात आई, पत्नी  दोन मुले असा परिवार आहे. नेहमीच हसतमुख असलेले रवी कांबळे यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे विविध क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध होते.

त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पंढरपूर लाईव्ह, बातमी 24 तास व वानखेडे परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

Post a Comment

0 Comments