चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लाखो रुपये केले लंपास

 

इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी गावात सहा अज्ञात दरोडेखोरांनी एका कुटुंबाला हत्यारांचा धाक दाखवून ३ लाख ३३ हजारांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.


चाकू लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर आदीचा धाक दाखवत चोरी केली आहे. 


कालींदा अशोक कुबडे वय ३९ वर्षे रा.लाखेवाडी ता. इंदापूर जि. पुणे यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलीस ठाण्यात सहा अज्ञात दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २७ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अंदाजे २२ ते २५ वयाचे 

सहा दरोडेखोर हातामध्ये चाकू, लोखंडी सळई, लोखंडी जंब्या, कोयते, सत्तुर, वाकड़ा कोयता 


अशा धारदार शस्त्रासह हातात बॅटरी घेऊन फिर्यादी यांचे सासरे ज्ञानदेव सिमाराम कुबडे झोपलेल्या खोलीची आतील कडी काढून त्यांनी खोलीमध्ये घुसले.


Post a Comment

0 Comments