मालकाने पागर दिला नाही, म्हणून कामगारांनी चक्क तिजोरीच उचलून नेली. सांगली जिल्ह्यातील्या विटामध्ये घडलेल्या या अजब चोरीप्रकरणी सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलंय.
सांगलीतील विटामध्ये सध्या एका अजब चोरीची चर्चा जोरात रंगलीय. 9 ऑक्टोबरला शिवाजी नगर इथं असलेल्या जिओ मार्ट ऑनलाईन सेंटरमध्ये चोरी झाली होती. या चोरीमुळे आजूबाजूच्या दुकानांमध्ये दहशत पसरली होती. तर संपूर्ण विटामध्ये खळबळ उडाली होती.
चोरट्यांनी जिओ मार्ट ऑनलाईन सेंटर दुकानाचं शटर फोटलं होतं. त्यानंतर सेंटरच्या आत प्रवेश करुन तब्बल 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी चक्क तिजोरीच उचलून नेत तब्बल 7 लाख 80 हजार रुपयांची रोकडही लंपास केली होती.




0 Comments