हिंजवडी : मुंबई-बंगळूर महामार्गावरील पुनावळे येथील एका शोरूम समोर शुक्रवारी (ता. २१) सकाळी साडे नऊच्या सुमारास भिषण अपघात झाला. ट्रकने मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली तर मागून येणारी मोटारही टेम्पोवर जोरात आदळली.
यातील मयत व जखमींची नावे अद्याप समजली नाहीत. सर्वांनारावेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक व विश्वसनीय माहिती अशी, एमएच १४, जेएल १५८८ क्रमांकाचा लहान टेम्पो वाकडकडून कामशेतला मंडप डेकोरेशनचे साहित्य घेऊन चालला होता टेम्पोत चलाकासह अन्य दोघे पुढे बसले होते तर एकजण मागे होता.
पुनावळे इथे पुढे असणारी ट्रक अचानकपणे आणि वेगात डाव्या बाजुला चालकाने दाबली यात टेम्पोला जोरदार धडक बसली जोरदार तर मागील कारही टेम्पोला धडकली.
या धडकेत टेम्पोतील तिघेजण कॅबिनमध्ये अडकली होती स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढण्यात आले.
आजपासून सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू होत असताना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऐन सणासुदीला सकाळीच अशी दुःखदायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





0 Comments