अखेर तिसऱ्या कामगाराचाही सापडला मृतदेह

 कामगाराचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव गणेश पालेकराव असून त्याचे वय 28 आहे. तो मूळचा नांदेड येथे राहणारा आहे.


गजानन कुरमभट्टी हे ठेकेदार या कंत्राटीचे ठेकेदार असून पहाटे 6 च्या सुमारास टॅंक सफाईचे काम सुरू होते. 


कामगार टॅंकमध्ये पडल्याने स्थानिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वाघोली अग्निशमन केंद्र येथे माहिती दिली होती.


अग्निशमन दलाला माहिती मिळतात अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक नितीन माने, संदीप शेळके, फायरमन चेतन खमसे, 


मयूर गोसावी, तेजस डांगरे, विकास पालवे, अभिजीत दराडे, अक्षय बागल हे तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन अथक प्रयत्नानंतर आता तीन मृत व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments