घटस्फोटित तरुणीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल

 ळगाव : कुसुंबा येथे वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय महिलेस अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसंबध ठेवले.


गर्भवती राहिल्याने लग्नाचे आश्वासन देत तिचा गर्भपात घडवून आणला, नंतर सोडून पळून गेल्याची घटना घडली.

पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


मूळ जळगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा साधारण तीन वर्षांपूर्वी कौटुंबिक कारणास्तव घटस्फोट होऊन ती दहावर्षीय मुलीसह विभक्त राहत होती.


भादली गावातीलच गणेश निवृत्ती सपकाळे याने पीडितेला गाठून तिचे पूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण दाखवून तिला ब्लॅकमेलिंग करत पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याने तिला लग्नाचे आमिष दाखत गर्भपात घडवून आणला.


लग्न न करता गणेशने पुणे येथे पळ काढला. पीडितेने विनवण्या करूनही प्रतिसाद देत नसल्याने अखेर तिने पोलिस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून गणेश निवृत्ती सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments