शहरातील बसस्थानकासमोर ६५ वर्षीय बापास पोटच्या लेकाने धारदार शस्त्राने पोटावर वार करून संपविले.
वसमत शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोरील एका हॉटेलमध्ये १८ ऑक्टोबर रोजी सकाळी अंबाजी गायकवाड (वय ६५, रा. गणेशपूर, ह.मु. औरंगाबाद) हे बसले होते.
अचानक त्यांच्या पोटच्या मुलासह तिघे त्यांच्या दिशेने आले. धारदार खंजीरने त्यांच्या पोटावर वार करून इतरांना काही कळण्याआधीच दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांना कळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
प्रथम दर्शनी विचारपूस करताच मुलानेच बापाला संपविले, अशी माहिती त्यांना मिळाली. पसार झालेल्या तिघांचा शहर पोलीस ठाण्याचे पथक शोध घेत आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा खून प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.





0 Comments