दोन पोरांची आई मिसकॉलवाल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली अन्..

 ध्याच व्हर्चुअल जग पाहता प्रेमाचे समीकरणदेखील बदलल आहे. आत्ताच्या जगात प्रेम हे सोशल मीडियावर फुलताना दिसत आहे. अनेकवेळा फेसबुक किंवा अन्य प्लॅटफॉर्मवरुन मेसेज द्वारे प्रेम जुळले असल्याचे पाहायला मिळाले आहे.


मात्र, उत्तर प्रदेशमध्ये अजब घटना पाहायला मिळाली. फक्त एका मिसकॉलवर प्रेम जुळल्याने एक विवाहिता प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना घडली आहे


उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथे ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे एक महिला आपल्या पतीसोबत राहत होती. त्यांना दोन मुलंदेखील होते. पाच महिन्यांपूर्वी त्या महिलेला तिच्या मोबाईल मिसकॉल आला होता.


तिनं त्याच नंबरवर पुन्हा कॉल केला. त्त्यानंतर तिची ओळख एका तरुणाशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. हळू हळू त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेमाखातर या महिलेन आपल्या दोन मुलांसह पतीला सोडून 16 सप्टेंबर रोजी फिरोजाबाद येथे पळून गेली.


तरुणाने तिला रसूलपूर येथे त्याच्या घरी घेऊन गेला. त्यांनी तिथे विधीपूर्वक लग्नही केलं आणि ते दोघंही जोडप्यासारखे राहू लागले. दरम्यान, आपली पत्नी पळून गेल्याने पतीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता ती फिरोजाबाद येथे असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिस पतीला सोबत घेत पत्नीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या घरी पोहचले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.



Post a Comment

0 Comments