उंच इमारतीवरून महिला आत्महत्या करणार, इतक्यात कोणीतरी उडी मारली आणि...

 मुंबई :सोशल मीडिया हे माहितीचं भंडार आहे. येथे माहिती आणि व्हिडीओ आपल्या दोन्ही गोष्टी मिळतात.


ज्यामुळे आपलं मनोरंजन होतं. परंतू येथे आपल्याला अशा गोष्टी देखील पाहायला मिळतात, ज्या खूपच थरारक असतात आणि त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण जातं. लोकांमध्ये आत्महत्येचा प्रकार वाढला आहे. नैराशातून बरेच लोक आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात.



यासंदर्भात तुम्ही देखील अनेक बातम्या वाचल्या असणार. परंतू या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ आत्महत्येचा आहे, ज्यामध्ये उंच इमारतीच्या खिडकीवर एक महिला बसली आहे. परंतू एक व्यक्ती तिचे प्राण वाचवतो.

वास्तविक, हा व्हायरल व्हिडीओ जपानमधील एका शहरातील आहे. यामध्ये एका महिलेने उंच इमारतीच्या खिडकीतून आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र एका व्यक्तीने तिचा प्रयत्न हाणून पाडला.




ही व्यक्ती अग्निशमन दलाशी संलग्न आहे. ती महिला ज्या खिडकीत बसली होती, तिच्या वरच्या खिडकीमध्ये ही व्यक्ती गेली आणि त्याने वरुन अशी काही उडी मारली की ती महिला सरळ मागेच पडली.

Post a Comment

0 Comments