प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, १६ ऑक्टोबर रोजी घडल्याचे समोर आले आहे. वैशालीने इंदौरमधील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली.
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, "वैशाली ही मागच्या काही काळापासून तणावाखाली होती. वैशालीला तिचा एक्स बॉयफ्रेंड त्रास देत होता. त्याच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती," असे चिठ्ठीत लिहिल्याची माहिती आहे. वैशालीच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये वैशालीने चाहत्यांना तिच्या साखरपुड्याची माहिती दिली होती. त्यानंतर जवळपास महिन्याभरातच वैशालीने तिचं लग्न रद्द झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती
वैशालीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यात तिने संजनाची भूमिका साकारली होती. तसेच 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'लाल इश्क' आणि 'विश और अमृत' या मालिकांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'ससुराल सिमर का' मधील तिच्या पात्रासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नकारात्मक भूमिकेसाठी गोल्डन पेडल पुरस्कार मिळाला होता.
वैशाली दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची खूप चांगली मैत्रीण होती. सुशांतसोबतचा तिचा फोटो व्हायरल होत आहे, जो तिने सुशांतच्या मृत्यूंनंतर शेअर केला होता. "नाही, नाही, मी रडणे थांबवू शकत नाही, कोणीतरी मला सांगेल की हे एक स्वप्न आहे, सुशांत एक अद्भुत व्यक्ती आणि अभिनेता होता," असे तिने लिहिले होते.




0 Comments