लोकांचा आज-काल जिममध्ये जाण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. आधी फक्त पुरुषांमध्ये ही क्रेज जास्त होती. पण आता मुली देखील जिममध्ये जाऊ लागल्या आहेत.
जिममध्ये शक्यतो लोक आपलं फिजिक्स बनवायला जातात. परंतू एका जिममध्ये काही वेगळंच पाहायला मिळालं आहे. खरंतर जिममध्ये महिला भांडताना दिसल्या. हे भांडण सादं नव्हतं तर चक्कं मारामारी पर्यंत प्रकरण पोहोचलं होतं.
हल्लीच ट्रेनमध्ये महिलांची भांडणं आणि मारामारीचा व्हिडीओ आपल्या समोर आला होता. त्यात आता हा जिममधील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. खरंतर हा व्हिडीओ कोणी भारतीयांच्या भांडणाचा नाही तर परदेशातील महिलांच्या भांडणाचा आहे, पण असे असले तरी देखील, भांडण कोणाला पाहायला आवडत नाहीत
परंतू तरी देखील लोकांना दुसऱ्यांच्या भांडणात नक्कीच मज्जा येते. त्यात हे परदेशी महिलांचं भांडण... मग तर लोक त्याला आवर्जून पाहातात. हे भांडण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं आहे, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन महिला किरकोळ कारणावरून भांडल्या होत्या.




0 Comments