३६ पैकी ३६ गुण मिळालेल्या वधू- वरामध्ये जोरदार हाणामारी....

 सोशल मीडियावर वधू-वरांचे व्हिडीओ सतत व्हायरल होत आहेत.

युजर्स या व्हिडीओचा खूप आनंद घेताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू-वर  पुष्पहार घालण्याच्या वेळी मंचावर उभे आहेत आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालत आहेत.


 मात्र, त्यावेळी असे काही घडते की, वधू-वराच्या भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

या व्हिडिओमध्ये या दोन्ही जोडप्यांनी लग्नाच्या स्टेजला जणू कुस्तीचा आखाडा बनवला आहे. वराने लग्नात मिठाई न खाल्ल्याने वधूला राग येतो आणि दुसऱ्याच क्षणी दोघांमध्ये मारामारी सुरू होते. या लग्नाचा एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जयमालाच्या वेळी एक नवविवाहित जोडपे एकमेकांना थप्पड मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडीयावर हास्याचा कल्लोळ पाहायला मिळतोय.


व्हिडीओमध्ये दिसत आहे की, वर प्रथम वधूला मिठाई खाऊ घालतो आणि वधू खाण्यास नकार देत आहे. वर म्हणतो ते खा, पण वधू मिठाई खात नाही, मग तिच्यावर ओरडून म्हणतो, अरे खा, मग वधूला जबरदस्तीने मिठाई खायला सुरुवात करतो. नववधू रडत असताना मिठाई खाते. 


पण आता वधूची पाळी आली आणि तीही वराला मिठाई खाऊ लागली, तेव्हा वराने खायला नकार दिला. पण मग वधू तिचा बदला घेते, ती वराला जबरदस्तीने मिठाई खायला घालते आणि त्याच्या तोंडात मिठाई टाकते. मग वराने वधूला थप्पड मारली आणि वधूहीमागे वळून त्याला थप्पड मारते. हे पाहून रंगमंचावर युद्धाचा आखाडा बनतो. दोघेही एकमेकांना मारहाण करू लागतात.

Post a Comment

0 Comments