मुंबई : वसई पूर्व भागातील रामदास नगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करत असताना अचानक स्फोट झाला, त्यामुळे घराला आग लागली.
दरम्यान त्या आगीत भाजल्याने सात वर्षीय शब्बीर अन्सारी याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
शब्बीरचे वडील शरफराज बेडरूममध्ये झोपले होते. तर शब्बीर आणि त्याची आजी हॉलमध्ये झोपली होती. यादरम्यान चॅर्जींग लावलेल्या बॅटरीने अचानक पेट घेतला आणि घराला आग लागली. दरम्यान शब्बीर त्या आगीत भाजला गेला. शरफराज यांंनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णाल्यात नेले परंतु त्याने अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी वसई माणिकपूर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चार्जींग सुरु असताना बॅटरीचा स्फोट कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
0 Comments