मुंबई : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी 2 चाइल्ड पॉलिसी म्हणजेच फक्त दोन मुलांचे धोरण विचारात घेतले जात आहे. महागाईच्या युगात आता कोणालाही 2 पेक्षा जास्त मुले जन्माला घालायची इच्छा नसेल.
लोक आता लहान कुटुंबाच्या जीवनशैलीला उत्तम मानतात.लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढल्यानं त्याचा सर्व संसाधनांवर अतिरिक्त ताण येतो. देशाच्या प्रगतीवर, विकासावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणामही होतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन देशातील सरकारे लोकसंख्या नियंत्रणाचा निर्णय घेतात. त्याच वेळी, एक महिला या प्रवृत्तीच्या विरोधात चालली आहे. या महिलेची मुलांबद्दल इच्छा ऐकून तुम्हाला जबर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. काय आहे महिलेची इच्छा वाचाच.
महिलेला वयाच्या 25 व्या वर्षी तब्बल 22 मुलांची आई आहे. महिलेचे नाव क्रिस्टीना ओझटर्क आहे. तिचा नवरा अब्जाधीश आहे. तिची इच्छा आहे की तिला अजून 83 मुले जन्माला घालायची आहेत. घरात 22 मुलं असल्यामुळे त्याचं घर हे बालगृह असल्या सारखं वाटतं. ज्या लोकांना ही माहिती मिळाली ते देखील हैरान झालेत.

.jpg)

0 Comments