प्रेमभंगातून एका तरुणाने पुणे रेल्वे स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडिया कॉलेज जवळील सिग्नल येथे गोरखपुर एक्सप्रेस थांबली होती. त्यावेळी मल्ला हा गाडीवर चढला. तो रेल्वे गाडीवरुन चालत आला. गोरखपुर एक्सप्रेस ही पुणे स्टेशन प्लॅटफार्म क्रमांक एक येथे आल्यानंतर तो रेल्वेवर चालत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने तारेला हात लावताच मोठा स्फोट झाला. तो उडून प्लॅटफार्म वर पडला.
लोहमार्ग पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले.
त्याच्यावर उपचार सुरु असून तो पूर्णपणे भाजला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
त्याने प्रेम भंगातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.



0 Comments